अजीजभाई शेख / राहाता:
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत गुरूंच्या मूल्यरुपी शिक्षणातून संस्काराची पाळीमुळे रुजली जातात. गुरूंची शिकवण हीच विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण शिदोरी आहे, असे मत प्राचार्य अंगद काकडे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकतेच गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या सन्मानासमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभागीय कार्यालयाचे बांधकाम निरीक्षक रामचंद्र नलगे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जगदीश आहेर यांनी केले तर कृष्णा काकडे व सार्थक जोरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन युवराज काळे यांनी केले. तर शेवटी अरबाज पठाण याने आभार मानले. कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त प्रास्ताविक व स्वागत आशिष माळी यांनी केले. तर यावेळी सानिका निबे, गायत्री पानसरे, दिशा चेचरे, सुजाता काकडे, डॉ.शरद दुधाट, उपप्राचार्य अलका आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धनंजय भोसले, अरुण कुळसुंदर, हिरा चौधरी याशिवाय शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तेजस काकडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन चैताली नरवडे व अमृता कारंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अश्विनी सोहनी व प्रतिभा ठोकळ यांनी नियोजन केले.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर)
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111