shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर दक्षिण चे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत वांबोरी येथील युवा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा..!!

विकासाचा ध्यास ठेवत सुख दुःख जपणे महत्वाचे- खासदार डॉक्टर निलेश लंके..!!

सुखात आणि दुःखत प्रसंगी जनतेत सहभागी होणे हे माझे कर्तव्य- खासदार डॉक्टर निलेश लंके..!!

नगर दक्षिण चे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत वांबोरी येथील युवा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
बुधवार ३१ जुलै २०२४


राहुरी (वांबोरी) :  अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे लाडके खासदार तरुण पिढीचे आयडॉल असलेले आणि ज्यांचे कोविड १९ काळात शरदचंद्र पवार यांच्या नावाने भव्य असे कोविड सेंटर सुरू करत वैद्यकीय सेवेतुन असंख्य रुग्णांची सेवा केली त्यातूनच त्यांना राज्यातच नव्हे तर देशात नावलैकिक मिळाले असे खासदार डॉक्टर निलेश लंके हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे माजी सरपंच किसनराव जवरे यांच्या मातोश्री चे निधन झाले म्हणून ते सांत्वनपर भेटीकरिता आले होते. 


          सदर कार्यक्रम नंतर त्यांना समजले की वांबोरी येथील शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांचा कार्यकर्ता युवा उद्योजक सूरज वाघ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने क्षणाचाही विलंब न करता वांबोरी येथे खासदार लंके यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या.


      "खासदार लंके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मी एक लोकप्रतिनधी आहे  मी ज्यांच्यामुळे खासदार झालो त्या सर्वसामान्याच्या सुखात आणि दुःखात देखील सहभागी होणे हे  मी माझे कर्तव्य समजतो. सुखात तर सगळेच सोबत असतात परंतु दुःखत प्रसंगी देखील सहभागी होऊन त्यांना दुःखातून सावरण्याकरीता नवउभारी दिली पाहिजे. असे यावेळी आपले मत व्यक्त केले."
    यावेळी उपसरपंच नितीनशेठ बाफना,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ ढवळे,विद्यमान सदस्य ईश्वर कुसमुडे, बंडू पटारे,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत नवले,युवा उद्योजक बंटी शेठ वेताळ, प्रगतशील शेतकरी महेश,पागिरे, उद्योजक भाऊ रहाणे आदी. उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close