shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

स्व. ससाणे साहेबांनी जिवाभावाची माणसे जपली - करण ससाणे

माजी आ.स्व. जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल व गणवेश चे वाटप
 
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष मा.आ. स्व. जयंतरावजी ससाणे यांनी तळागाळातील सहकाऱ्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करून जिवाभावाची माणसे जपल्याचे प्रतिपादन  जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले.
 श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, श्रीरामपूर शहर काँग्रेस  व स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित मा. आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल व गणवेश वाटप कार्यक्रम प्रसंगी करण ससाणे बोलत होते. 
ते पुढे म्हणाले की, श्रीरामपूर मधील काँग्रेसची संघटना मजबूत ठेवण्यासाठी स्व. ससाणे साहेबांचे मोलाचे योगदान आहे. 

यानंतर माजी नगराध्यक्ष संजय फंड  म्हणाले की, स्व. ससाणे साहेब कधीही नेता म्हणून वावरले नाही त्यामुळे सर्वांना ते आपलेसे वाटत. यावेळी जि.प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की, स्व. ससाणे साहेबांचा सर्वसामान्यांना मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा वारसा ससाणे दांपत्यांनी जपला आहे. 
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी स्व. ससाणे यांची खूप तळमळ होती, त्यासाठी त्यांनी तालुक्यात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या .
 यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की, स्व. ससाणे साहेबांची शिकवण आमच्यासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या सबका भला सोच या तत्वानुसारच सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. 
मा. नगरसेवक श्रीनिवास बिहानी म्हणाले की स्व. ससाणे साहेबांची विचारधारा आणि आदर्श पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले.
यावेळी मा.नगरसेवक  रमण मुथा,भास्करराव लिफ्टे, मुरली राऊत, मुन्ना झंवर, अशोक उपाध्ये, अशोक थोरे,अशोकराव जगधने, रवींद्र गायकवाड व निलेश भालेराव यांनी आपल्या भाषणातून स्व. जयंतरावजी ससाणे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल व अनाथ मुलांना गणवेश चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश निमसे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी,मा.नगरसेवक रमेश कोठारी, सुनील बोलके, हाजी मुजफ्फरभाई शेख, मुन्नाभाई पठाण,के. सी. शेळके,दिलीप नागरे, रितेश रोटे, शशांक रासकर, आशिष धनवटे, मनोज लबडे, दिलीप सानप, महंता यादव, सुनील गुप्ता, सुहास परदेशी, जनाकाका जगधने, रमजान शहा, सौ. संगीताताई मंडलिक, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, मर्चंट असोसिएशनचे सर्व संचालक, तालुक्यातील सर्व सरपंच, सोसायटीचे चेअरमन, संचालक, आदी मान्यवर व स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे शेकडो सहकारी उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close