shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाटबंधारे मोर्चा : लोकसेवा विकास आघाडीच्या मागण्या मान्य; अशोक बंधारे, गावतळी भरून घ्यावीत, हिम्मतराव धुमाळ यांचे आवाहन


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.९) वडाळा पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि, मागण्या मान्य झाल्याने ओव्हरफ्लोचे पाण्याने गावोगावचे अशोक बंधारे, पाझर तलाव, गावतळी भरून घ्यावीत, असे आवाहन अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन तथा लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी केले.

             याबाबत श्री.धुमाळ म्हणाले की, प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे सोडण्यात आलेले पाणी भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना सोडून शेतीसाठी आवर्तन घ्यावे तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचे गावतळी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता यांना निवेदन देऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वडाळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे यांचेशी झालेल्या चर्चेत ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी व अशोक बंधारे भरून देण्यात येतील तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाणी देण्यात येईल, असे त्यांनी मान्य केले. तेव्हा गावोगावच्या कार्यकर्त्यांनी याबाबत लक्ष देवून चारीला पाणी सोडले आहे की नाही याची खात्री करावी. तसेच गावातील अशोक बंधारे, पाझर तलाव, गावतळे भरून घ्यावीत. याबाबतीत काही अडचण असल्यास अशोक कारखान्याचे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्री.धुमाळ यांनी केले. - संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर -९५६११७४१११
close