shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.तुषार एकनाथ ढोणे यांना पीएच.डी. पदवी घोषित


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील गळनिंब येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेचे मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. तुषार एकनाथ ढोणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेतर्फे नुकतीच इंग्रजी विषयाची पीएच्.डी. घोषित करण्यात आली.

मिरजगाव येथील प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक व पुणे येथील डॉ. शिल्पागौरी  गणपुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. तुषार ढोणे यांनी " डिपीक्शन ऑफ ट्रॅडिशनल इंडिया अँन्ड मॉडर्न इंडिया इन द सिलेक्ट वर्क्स ऑफ व्हि. एस. नायपॉल अँड अरविंद अडीगा" या विषयावरील प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. या प्रबंधावरील अनुकुल अभिप्राय पात्र होऊन विद्यापीठ इंग्रजी विभागात मुलाखत परीक्षा संपन्न झाली. संगमनेर येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. उमेश जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली मौखिक परीक्षा संपन्न .झाली. प्रा. तुषार ढोणे यांना पीएच.डी. पदवी घोषित झाल्याबद्दल मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, डॉ. गणेश वाघ, श्रीरामपूर येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सुनीलं देवकर, अकोले येथील प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, उक्कलगाव येथील इंद्रनाथ पाटील थोरात, आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, प्रा. नामदेव ढोणे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, गळनिंब ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close