shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वतःच्या समाधानासाठी “आनंदाने” जगणे म्हणजे आयुष्य - आ. दत्तात्रय भरणे.काटीत ६०० महिलांची एकदिवसीय मोफत शेतकरी सहलीचे आयोजन तर आमदार भरणे यांनी दिल्या शुभेच्छा

स्वतःच्या समाधानासाठी “आनंदाने” जगणे म्हणजे आयुष्य - आ. दत्तात्रय भरणे.

काटीत ६०० महिलांची  एकदिवसीय मोफत शेतकरी सहलीचे आयोजन तर आमदार भरणे यांनी दिल्या शुभेच्छा
इंदापूर : महिलांना त्यांचा स्वतःचा एक दिवस जगता यावा . जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही. तर स्वतःच्या समाधानासाठी “आनंदाने” जगणे म्हणजे आयुष्य आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी उसंत मिळावी. सर्वांनी एकत्र येत आनंद साजरा करावा. यासाठी महिला शेतकरी सहलीचे निमित्त साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने ही काटी ग्रामपंचायतचा आदर्श घेऊन महिलांना व नागरिकांना विविध योजना मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी काटी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ६०० महिलांना सहलीसाठी १२ एसटी बस द्वारे नियोजन (दि. १ सप्टेंबर)करण्यात आले होते. या सहलीत जाणाऱ्या महिलांना सकाळी काटी गावात शुभेच्छा देताना महिलांना संबोधित करताना केले.  
यावेळी  पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,साहेबराव मोहिते,सरपंच सोमनाथ मोहिते,दिनकर मोहिते,रेखा मरगळ,अमोल गोरे,संतोष मोहिते,तुकाराम मोहिते,संजय परांडे,रोहिदास मोहिते,राहुल मोहिते ,मारुती बाशिंगे,शिवाजी मोहिते,मल्हारी शिंदे,महादेव मोहिते,शरद बोराटे,महादेव यादव,प्रकाश राऊत लखन परांडे विकास भोसले शिवाजी माने अमोल गोरे दत्तू माने तसेच  आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काटी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच सोमनाथ मोहिते यांच्या कल्पनेतून व इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी ६०० महिलांची  एकदिवसीय मोफत शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.ही सहल काटी येथून कृषी विज्ञान केंद्र बारामती, मोरगाव येथील गणपती, केतकावळे येथील प्रती बालाजी त्याचबरोबर सोमेश्वर येथील सोमनाथ दर्शन या ठिकाणी  ही सहल भेट देणार आहे, यासाठी महाराष्ट्र परिवहन एसटी महामंडळाच्या १२ बसेसची सोय करण्यात आली आहे. या सहलीमध्ये सर्व महिलांना मोफत नाश्ता व जेवण ही देण्याची नियोजन करण्यात आली असल्याची माहिती काटी ग्रामपंचायतचे  सरपंच सोमनाथ साहेबराव मोहिते यांनी दिली. 

  या महिला शेतकरी सहलीच्या नियोजनासाठी भरतवाडी फाउंडेशनचे सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते.
close