*मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.*
इंदापूर : न्यू लिप इंग्लिश स्कूल प्रांगणात इंदापूर येथे मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच UPSC , MPSC परिक्षेत यश संपादन केलेल्या व शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा व पुस्तक भेट देऊन करण्यात आला. तसेच ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचाही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अर्णव लावर या इयत्ता ३ री तील विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला.
मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल घोगरे, तालुकाध्यक्ष प्रमोद देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रतिक झोळ, दौंड तालुका अध्यक्ष समिर मोहिते, संभाजी ब्रिगेड बारामती तालुकाध्यक्ष तुपे पाटील, प्रमोद जगताप, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेश वाघ यांनी केले व सूत्रसंचालन गणेश रणदिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उदयसिंह भोसले यांनी केले.