shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वस्तरीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बोलबाला



               आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीने ऑगस्ट महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथचे (महिन्यातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचे) नामांकन जाहीर केले आहे. यावेळी पुरुष आणि महिला या दोन्ही गटात एकाही भारतीयाचा समावेश नाही. भारतीय पुरुष संघाने ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती ज्यामध्ये टीम इंडियाला ०-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघाचा धुव्वा उडविणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूला ऑगस्ट महिन्याच्या प्लेअर ऑफ द मंथच्या नामांकनात निश्चितच स्थान मिळाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला आशिया चषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. ऑगस्ट महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथच्या नामांकनांवर एक नजर टाकूया.
केशव महाराज- दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी डावखुरा फिरकीपटू केशव महाराज वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या आयसीसी पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी नशीब अजमावणार आहे. महाराजने दक्षिण आफ्रिकेची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहीम पुन्हा रुळावर आणली. त्यामुळे द. आफ्रिकेला दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकण्यात मदत झालीली. दोन सामन्यांत त्याने तेरा विकेट घेतल्या, जे फक्त १६.०७ च्या सरासरीने आले.

जेडेन सील्स- वेस्ट इंडियन वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा प्रमुख गोलंदाज बनून आपली योग्यता सिद्ध केली. त्याने दुसऱ्या सामन्यातील नऊ विकेट्ससह १८.०८ च्या सरासरीने बारा बळी घेतले

 दुनिथ वेल्लागे- श्रीलंकेचा प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू ड्युनिथ वेल्लालगे याने गेल्या महिन्यात भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याने बॅट व बॉलने आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. भारताविरुद्धच्या मालिकेत या युवा अष्टपैलू खेळाडूने १०८ धावा केल्या आणि ७ बळी घेतले. वेल्लालगेची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ६७ होती आणि या मालिकेत त्याने रोहित आणि गिलच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या.

                महिला गटात श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमाशिवाय आयर्लंडच्या ओरला प्रेंडरगास्ट आणि गॅबी लुईस यांना नामांकन मिळाले आहे.

                कारकिर्दीतील रेड हॉट फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे.  इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जो रूटने ५२ धावा केल्या तर तो डब्ल्यूटीसी मध्ये इतिहास रचू शकतो. या ५२ धावांसह रूट डब्ल्यूटीसी मध्ये ५००० धावांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. आम्ही  आतापर्यंत कोणताही फलंदाज डब्ल्यूटीसीमध्ये मध्ये ४००० धावांचा टप्पाही गाठू शकलेला नाही.

             जो रूटने डब्ल्यूटीसीमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५७ सामन्यांच्या १०४ डावांमध्ये ५२ .०८ च्या उत्कृष्ट सरासरीने ४९४८ धावा केल्या आहेत. पाच हजारच्या जादुई आकड्यापासून तो केवळ ५२ धावा दूर आहे. डब्ल्यूटीसीमध्ये रूटची सर्वोत्तम धावसंख्या २२८ धावा आहे जी त्याने सन २०२१ मध्ये गॉल कसोटीत श्रीलंकेविरुद्ध केली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जो रूटनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदज ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन ३९०४  धावांसह या दुसऱ्या स्थानावर आहे. तो ४००० धावा पूर्ण करण्यापासून ९६ धावा दूर आहे.  आश्चर्याची बाब म्हणजे या टॉप-५ फलंदाजांच्या यादीत एकही भारतीय नाही.

               जो रूट आणि मार्नस लॅबुशेन यांच्याशिवाय स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि बाबर आझम टॉप-५ मध्ये आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा २५५२ धावांसह आठव्या तर माजी कर्णधार विराट कोहली २२३५ धावांसह चौदाव्या स्थानावर आहे.

               मागच्या महिन्यात जागतिक स्तरावरील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असल्याने आयसीसीच्या पटलावर चमकेलच पण ज्यो रूट सध्या भन्नाट फॉर्मात असून तो इंग्लंडसाठी स्वप्नवत कामगिरी करत आहे.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close