शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
शैक्षणिक बातमी
व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सकाळ विभाग आणि दुपार विभागाची एकत्रित सभा प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये संपन्न झाली. सभेचा मुख्य विषय प्रहारी क्लब अंतर्गत 'एक युद्ध नशे के विरुद्ध ' होता. शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांच्या मार्गदर्शना खाली सभा पार पडली.
प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांनी प्रहारी क्लबची रुपरेषा शिक्षकांना समजावून सांगत, क्लबचे कार्य कशाप्रकारे चालावे या सदर्भामध्ये मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी क्लब अंतर्गत शिक्षकांनी कशाप्रकारे कार्य करावे, आणि यामध्ये विद्यार्थ्यांना कसे सामावून घ्यावे याचेही मार्गदर्शन केले.
शाळेतच समिती अध्यक्षांनी प्रथम नवनिर्वाचित उपमुख्याध्यापक श्री. विसाळ सरांचे स्वागत केले, त्यानंतर प्रशालेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले. अध्यक्षांनी काही शाळेमध्ये घडणाऱ्या अप्रिय घटनांचा उल्लेख करत आपण कशाप्रकारे पावले उचलली पाहिजेत जेणेकरून अशा घटना टाळता येऊ शकतात या साठी मार्गदर्शन केले.शाळेतील शिक्षकांवरती दिवसेंदिवस येणाऱ्या जबाबदाऱ्या अध्यक्षांनी शिक्षकांसमोर मांडल्या आणि शिक्षकांनी आपले कार्य विद्यार्थी केंद्रित करावयास हवे यासाठी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन पर सभेसाठी शाला समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक श्री. विसाळ सर, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई टेलर, श्री राजेश मेहता, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक श्री. गजेंद्रगडकर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. दहिफळे यांनी मानले.