shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या प्रयत्नातून अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना अनुदान मिळणार


मुंबई / प्रतिनिधी:
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे यांनी सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तसेच सांस्कृतिक विभाग यांचेकडे गेल्या आठ महिन्यांपासून करोना महामारीमुळे नुकसान झालेल्या मराठी चित्रपट निर्माता यांचे अनुदान, अपात्र चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून सरसकट अनुदान देण्याची मागणी केली होती, त्याला बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष) यांनी सहकार्य केले आणि दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी ना. सुधीर मुनगंटीवार आणि संपूर्ण सांस्कृतिक विभाग अधिकारी यांची बैठक मंत्रालय येथे झाली.
त्यामध्ये मा.मंत्री महोदय यांनी अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना अनुदान देण्याची विनंती स्विकारली आहे. 
तरी अनुदान अपात्र मराठी चित्रपट निर्माता यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांचेकडे संपर्क साधून आपल्या चित्रपट बाबत माहिती द्यावी.
याप्रसंगी मराठी चित्रपट अनुदान योजनेत बदलही करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांनी सुचना दिल्या असून जास्तीत जास्त मराठी चित्रपटांना अनुदान मिळेल असा नवीन शासन निर्णय घेण्याचे संबंधित अधिकारी यांना सुचविले आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते यांचेकडून अभिनंदन होत आहे.
या निर्णयानंतर निर्माता महामंडळ मराठी चित्रपट वितरणातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून कोणत्याही मराठी चित्रपटांना थिएटरचा प्रॉब्लेम राहणारच नाही असे देवेंद्र मोरे/ बाळासाहेब गोरे यांनी सांस्कृतिक मंत्री यांना प्रस्ताव दिला आहे.

*वृत्त विशेष सहयोग
बाळासाहेब गोरे - मुंबई 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close