shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षकांच्या हुंकार आंदोलनास पाठिंबा म्हणून शिक्षक समन्वय संघ श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने शाळा बंद आंदोलन


श्रीरामपूर / प्रतिनिधी :
मुंबई येथील आझाद मैदानावर गेली ४८ दिवसांपासून अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक  शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान मिळावे याकरिता शिक्षक समन्वय संघाकडून शिक्षकांच्या न्याय व रास्त मागणीसाठी हुंकार आंदोलन पुकारण्यात आले असून शुक्रवार दि.२७/०९/२०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांनी सहभाग नोंदवित जाहीर पाठिंबा दिला असून आज श्रीरामपूर तालुका जि.अहमदनगर येथील समस्त अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांची भेट घेऊन त्यांना शाळा बंदबाबत लेखी निवेदन दिले.

          यावेळी श्री.पाचपिंड सर,लबडे सर,इनामदार सर, आरिफ सर, इब्राहीम बागवान सर,साबीर शाह सर,आजिज शेख सर, अल्ताफ काकर सर, रूपटक्के सर,भांगरे सर, बडाख सर, त्रिभुवन सर आदि उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
इब्राहिम बागवान (सर) श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close