कोपरगांव / प्रतिनिधी:
तालुक्यातील धामोरी येथे गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुदत ठेवी संदर्भात मिटिंग वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (मिटिंग मध्ये) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग ,सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अहवाल,ताळेब व नफा तोटा पत्रके वाचुन दाखविण्यात आले.तसेच संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्याकडील दर्जाबाबत कलम ७५/५ या नुसार चर्चासत्र ही करण्यात आले.२०२४-२०२५ चे वैधानिक लेखापरीक्षण करणेकामी लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली.
या गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन प्रसंगी संस्थेचे चेअरमन संस्थापक मा.ज्ञानदेव पाटील मांजरे, मा.नारायण पाटील मांजरे,मा.सुनीलराव मांजरे,व्हा.चेअरमन मा.दत्तात्रय वाघ,संस्थेचे व्यवस्थापक मा.प्रशांत ज्ञानेश्वर कदम,कॅशीयर नारायण माळोदे,कर्मचारी बाळासाहेब वाघ,संस्थेचे संचालक मंडळ मा. शिवाजीराव पेखळे,लहु उत्तम पवार,राजाराम पवार,सुनील दत्तात्रय गाडे, सौ.अर्चना संजय भाकरे.तज्ञ संचालक गणेश (बबलु) पंडितराव जाधव,कृष्णराव ज्ञानदेव मांजरे,सौ.सयाबाई गोपाळा दिघे.निमंत्रित संचालक संजय अमृता मोरे, भिकन ईतबार शेख,योगेश प्रकाश जेजुरकर,निमंत्रित संचालक चैतन्य दगुजी भाकरे.व ठेविदार सेविंग सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६२१७४१११