shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा स्पर्धेसाठी कदम विद्यालयातील खेळाडूंची निवड*

*जिल्हा स्पर्धेसाठी कदम   विद्यालयातील खेळाडूंची निवड* 
इंदापूर: रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील 8 खेळाडूंची विविध खेळ प्रकारात जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली असून विद्यालयाच्या वतीने या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.  तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा  तालुका क्रीडा संकुल इंदापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या मैदानी स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील 100 मीटर हर्डल्स खेळ प्रकारात तृप्ती बोराटे हिने प्रथम तर धनश्री खरात हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 14 वर्षाखालील ८० मीटर हर्डल्स मध्ये भक्ती बोराटे हिने प्रथम तर श्रेया मखरे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. 19 वर्षाखालील खेळ प्रकारात सिद्धी भोंग हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील हातोडा फेक प्रकारात गौरी माने हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 19 वर्षाखालील हातोडा फेकमध्ये  विराज गायकवाड यांने द्वितीय क्रमांक मिळवला.100 मीटर धावणे प्रकारात सिद्धी भोंग हिने तृतीय क्रमांक मिळवला.सांघिक 4*100 मीटर रीले प्रकारात 14 वर्षाखालील मुलीनी तृतीय क्रमांक  तर 19 वर्षाखालील मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला. 4*400 मीटर रिले प्रकारात 17 वर्षाखालील मुली व 19 वर्षाखालील मुले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.गोळा फेक प्रकारात गौरी माने ने तृतीय क्रमांक मिळवला तर 19 वर्षाखालील हाथोडा प्रकारात सुमैय्या शेख हिने तृतीय क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ग्रिको रोमन प्रकारात प्रथमेश बनकर या खेळाडूची जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक सुनील मोहिते यांचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य प्रदीपदादा गारटकर, विठ्ठल आप्पा ननवरे, श्रीधर बाब्रस, डॉ.श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम,कैलास कदम,राजश्री मखरे,पर्यवेक्षिका पुष्पा काळे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव,पालक शिक्षक संघ, माता पालक संघ ,माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले व जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
close