shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र.

धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र. 
इंदापूर: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाबतचा पत्र दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी दिले असून यामध्ये नमूद केले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज हा पिढ्यानपिढ्यापासून मेंढपाळाचा व्यवसाय करीत आलेला आहे. अत्यंत शांत संयमी व काबाडकष्ट करणारा बहुतांश धनगर समाज हा महाराष्ट्रातील आर्थिक जडणघडणातील एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्या या समाज बांधवांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या जमातीचा अनुसूचित जातीमध्ये समावेश होण्याबाबत अनेक वर्षापासून तीव्रतेने मागणी होत आहे. या अनुषंगाने विविध पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलने पुकारण्यात येत आहेत. सध्या पंढरपूर येथे सकल धनगर समाजाचे मागील तेरा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या समाजाचे शैक्षणिक सामाजिक व आर्थिक मागासले पण लक्षात घेता ही मागणी योग्य आहे. तरी महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हिताचा निर्णय तातडीने घ्यावा अशा आशियाचे पत्र देण्यात आले.
close