shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भारत ननवरे यांची निवड.*शिक्षक, विद्यार्थी हितासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार - नूतन जिल्हाध्यक्ष भारत ननवरे.


*महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भारत ननवरे यांची निवड.*
शिक्षक, विद्यार्थी हितासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार - नूतन जिल्हाध्यक्ष भारत ननवरे.
इंदापूर: दि २० महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संघटनेचे *राज्याध्यक्ष व्यंकटराव जाधव* यांनी *पुणे जिल्हाध्यक्षपदी भारत ननवरे यांचे निवडीचे पत्र दिले.* ननवरे हे  २० वर्षे प्राथमिक शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्याचबरोबर *तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यात अग्रेसर राहिले आहेत.* त्याचप्रमाणे संघटन कौशल्य, चिकाटी, नेतृत्व गुण, समाजाप्रती असलेली निष्ठा यामुळे पुणे सारख्या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. असे राज्याध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी सांगितले.
        *नूतन जिल्हाध्यक्ष भारत ननवरे* यांनी मिळालेल्या संधी ही शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परीषदेची जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यात शाखा निर्माण करणे. परिषदेचा विस्तार करणे प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे सांगितले. *भारत ननवरे यांच्या सार्थ व योग्य निवडीचे जिल्हातील प्राथमिक शिक्षकानी स्वागत केले आहे.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
close