shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महेश वैद्य यांचा पांडे येथे नशा मुक्त भारत व सशक्त भारत अभियान संपन्न


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२ / सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार द्वारा नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा कल्याण विभागाचे ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पांडे येथे ग्रामस्थांसाठी दिनांक 19 रोजी नशा मुक्त भारत व सशक्त भारत अभियान संपन्न झाला. दि. 20 आणि 21 रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत पांडे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचे लाभ पांडे ग्रामस्थांनी पुरुष तसेच महिला वृद्ध आणि मुलांनी घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार श्री सुनील भोसले आणि त्यांच्या टीमने केले. यावेळी योगेश ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानदेव क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री महेश वैद्य यांनी घरातील कर्ता पुरुष जर दारूच्या नशेच्या आहारी गेला असेल तर त्या कुटुंबाची अवस्था काय होते आणि त्याचे कुटुंबातील मुला मुलीवर काय परिणाम होतात याबद्दल सत्य वास्तव आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. तसेच आरोग्या बद्दल काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे व्यायाम करून घेतला.
ज्याला आरोग्याचे महत्त्व समजले अशी व्यक्ती सहसा नशेच्या आहारी जात नाहीत असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.

घरातील पालकांनी मुलांना तंबाखू गुटखा अथवा दारू आणायला सांगू नये कारण मुले ही अनुकरणप्रिय असतात कालांतराने त्याचे पडसाद आपल्या डोळ्यादेखत पहावे लागतात यासाठी पालकांनी सावधान राहिले पाहिजे. गावातील पत्रकार मंडळी आणि शिक्षक मंडळींनी यामध्ये पुढाकार घेतला. कारण ते समाजाचा आरसा असतात. आपण गाव सुधारण्यासाठी शाळा मंदिरे समाज मंदिरे बांधतात कारण त्याचे पावित्र्य असते पण माणसांनी खरे काम करणे आवश्यक आहे ते म्हणजे जशी मंदिरात समाज मंदिरात इतरत्र जाऊन आपले मन शुद्ध होत असेल तर ते केले पाहिजे पण त्याबरोबर आपले जे शरीर आहे ते पण आतून आणि बाहेरून स्वच्छ राहिले पाहिजे त्यासाठी नशा मुक्त होणे दारु पिणे सिगरेट गुटखा पान मसाला वगैरे न खाणे ही देखील पवित्र देहाची व्याख्या आहे. आणि दुर्दैवाने त्याकडेच आपली दुर्लक्ष होते. तरी ग्राम सुधार समितीने याकडे विशेष लक्ष द्यावे प्रत्येक सुजाण नागरिकांनी यामध्ये आपले योगदान द्यावे अशी कळकळीची विनंती महेश वैद्य यांनी केली.

यावेळी पत्रकार श्री विशाल घोलप आणि श्री अशोक मुरूमकर हे आवर्जून उपस्थित होते. पांडे येथील ग्रामस्थ श्री अशोक कुलकर्णी यांच्या हस्ते महेश वैद्य यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमास गयाबाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर आणि श्री सुधीरजी बाभळे सर यांचे सहकार्य लाभले. श्री आप्पा भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच आमचे मित्र करमाळा येथील श्री संजय मोरे उर्फ अण्णा यांनी मुलांना हसण्यासाठी काही जोक सांगितले त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. महेश वैद्य यांनी पांडे ग्रामस्थांचे आभार मानले.
close