प्रतिनिधी : संजय वायकर
२४ वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याण महोत्सवानिमित्त, राज्य शासनामार्फत राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत दि . ३० ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळविण्यात आले आहे .
सदर महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला व शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा यांचा समावेश आहे. भगवान महावीर स्वामी यांच्या कार्याची ओळख, त्यांनी दिलेला संदेश आणि विचार यांची शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभरातील शाळांमधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीचे गठन करण्यात आलेले आहे. सदरील उपक्रम शालेय शिक्षण विभागामार्फत साजरा करण्यात येत असून, सांस्कृतिक कार्य विभाग या उपक्रमाचे समन्वय करणार आहे.
या उपक्रमामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेणे होय. "भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख" हा निबंध स्पर्धेचा विषय असून, आपल्या जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व माध्यमांच्या खाजगी तसेच शासकीय शाळांमधून विद्यार्थी या निबंध स्पर्धेत भाग घेणार असल्याचे समजते. या स्पर्धा व उपक्रम सुलभपणे आयोजित व्हावेत, यासाठी जिल्हास्तरावर अशासकीय सदस्यांची समिती निर्माण करण्यात येणार असून सदर समिती स्थानिक ठिकाणी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे .
निबंध स्पर्धेचे विषय, अटी, आयोजन, मूल्यांकन, प्रक्रिया याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत योग्य तो समन्वय ठेवून या उपक्रमाची शालेय विद्यार्थी आणि स्थानिक ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी सहकार्य करणार आहेत .
भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात यशस्वीपणे या निबंध स्पर्धा आणि उपक्रमाचे आयोजन करून या उपक्रमात व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने, जिल्हास्तरावर नेमण्यात आलेली अशासकीय सदस्यांची समिती सहकार्य करणार असल्याचे समजते .