प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २९/ करमाळा शहर व तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांना करमाळा येथील क्षितिज महिला ग्रुप यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी क्षितिज महिला ग्रुपच्या डॉक्टर सुनिता दोशी यांनी सांगितले की आपल्या आयुष्यातील प्रकाश हा इतरांच्याही आयुष्यात निर्माण व्हावा यासाठी जे हतबल व दुर्लक्षित घटक आहे अशा वृद्ध निराधार लोकांना आम्ही हे फराळ वाटप केले परंतु याहीपेक्षा श्रीराम प्रतिष्ठान हे गेली आठ वर्षापासून अखंडितपणे या वृद्ध निराधार लोकांना मोफत जेवण देऊन त्यांची सेवा करतात हे खूप मोठे महान कार्य असून हे कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. हे कार्य श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच वृद्धिंगत होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्षितीज महिला ग्रुपच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या त्यांनी सर्व लाभार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप केले. या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे, सदस्य विलास आबा जाधव, प्रमोद फंड, अमोल पवार, संदीप काळे, महादेव गोसावी इं. उपस्थित होते. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विलास जाधव यांनी क्षितिज महिला ग्रुपचे आभार मानले.