shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपक्ष उमेदवार संजय बबुताई भास्करराव काळे‌ यांचा परिचय

*संजय बबुताई भास्करराव काळे
*अपक्ष उमेदवार
*२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघ..

              परीचय
शिक्षण.. एम एस सी (गणित) पुणे विद्यापीठ पुणे

३६ वर्षे प्रामाणिक पणे Alembic Pharmaceuticals कंपनीत नोकरी केलली.. निवृत्त झालो,.

माझी पाच एकर बागाईत जमीन मी जंगल लावून निसर्गाला अर्पण केली..

मला ३६५०  रुपये प्रतिमाह पेन्शन मिळते..

माझा मुलगा उच्च न्यायालयात वकील आहे.. मुलगी देखील वकिल आहे..

भारतीय राज्य घटना शिक्षणात यावी ह्या साठी कोपरगाव ते मुंबई ३५० कि मी पायी गेलो एप्रील महिन्यात..

कालव्याचे पाणी मिळावे शेतकऱ्यांना म्हणून पढेगाव ते नांदूरमधमेश्वर पायी गेलो..

पुणतांबा चौफुली ते झगडे फाटा रस्त्यासाठी पाच दिवस तुरुंगवास भोगला..

रस्ते चांगले व्हावे ह्या सुचना देताना खोटे सरकारी कामात अडथळा गुन्हे झेलले जे भविष्यात निर्दोष शाबीत झाले..

जनहितार्थ उच्च न्यायालयात ५०  पेक्षा जास्त याचिका दाखल केल्या..

कोपरगाव शहराला रोज पाणी मिळावे ह्यासाठी पाच नंबर तलावाचे स्वप्न पाहिले पुर्तीसाठी सत्याग्रह केले...

ऊस जाळून तोडणे, ऊसाला चार हजार रूपये प्रतिटन भाव मिळावा म्हणून सत्याग्रह केले..

अनेक रस्त्यांचे कामासाठी, गुणवत्तेसाठी सत्याग्रह केले...

सरकारी दवाखान्यात डॉक्टर, औषधे मिळावेत म्हणून सत्याग्रह केले..

ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन वेगळे व्हावे म्हणून न्यायालयात भांडलो...

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव व इतर चौदा मागण्यांसाठी चौदा वर्षे दर महिन्याचे तिसऱ्या रविवारी लाक्षणिक उपोषणांची मालिका केली...

सन २०१२ पासून दर रविवारी न चुकता स्वच्छता अभियान राबवतो...

आजवर १७००  पेक्षा जास्त वृक्ष लावले व त्यांचे संगोपन केले..

 सन २००० पासून दर गुरूवारी शिरडीला पायी वारी करतो..

सन २००९ पासून दर रविवारी संध्याकाळी तपोभुमी साईमंदिरात भजन व पालखीचा अविभाज्य भाग आहे..

साईबाबा संस्थान चा माझा लढा सर्वश्रुत आहे...

भ्रष्टाचार कोणाचाही असो मी आवाज उठवला आहे...

सत्याग्रह मी आजवर तहसील, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्रालय,शासकिय दवाखाना, वीज मंडळ, पाटबंधारे इत्यादी एकही कार्यालय मी सोडले नाही..

एका याचिकेमुळे राज्यात चोवीस हजार पोलीस भरती झाली..

एका याचिकेमुळे दहा ग्राम न्यायालये उघडली..
   
हे सर्व काम आजवर मी माझ्या पगारातुन, घामाचे उत्पन्नातुन केले.. मला माझ्या वडीलांनी, आजोबांनी संपत्ती अथवा सत्ता दिली नाही.. तरी मी आजवर सामाजिक काम केले.. मी कोपरगाव विधानसभा उमेदवार होण्यास माझा हा अल्प परिचय पुरा..

जर आपणास हे पत्रक वाचून आवडले नाही तर कृपया कचरा कुंडीत च टाका.. अधीच मतदार संघ खूप घाण झाला आहे.. कचरा कुंडीतच टाका.. मी स्वच्छतेचा पाईक..

*संजय बबुताई भास्करराव काळे
*अपक्ष उमेदवार
close