shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • "विदाईचा क्षण... डोळ्यात अश्रू, मनात आठवणी!"
  •              🌍
  • राजेंद्र रामदास चौधरी यांची एरंडोल तालुकाप्रमुख – राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल पदी नियुक्ती.
  •              🌍
  • सन्माननीय रामचंद्र मंजूळे यांना रोप्य महोत्सवी सहजीवनास हार्दिक शुभेच्छा!
  •              🌍
  • गरिबांचा दाता सुरेशभाऊ कुलकर्णी साहेबांना वाढदिवसानिमित्त मनस्वी शुभेच्छा..!
  •              🌍
  • विशाल जेठे यांचे "बॅनर स्टुडिओ" बहुउद्देशीय ॲप डिजिटल क्रांतीकडे एक मोठे पाऊल...!
  • -->

    About Me

    पंकजाताईंचे मातब्बर एकनिष्ठ नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी झाले सक्रिय!!

                                              

    प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-                                      
    केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्यासाठी लोकनेत्या आ.पंकजा मुंडे या पुर्ण ताकदीने मैदानात उतरल्या असून काल रात्री भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या घरी केज विधानसभा मतदारसंघातील नाराज असणाऱ्या भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन सर्वांनी मिळून मिसळून सौ.नमिता मुंदडा यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे.            

    केज विधानसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता मुंदडा यांना मी उमेदवारी दिली आहे त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात मी उभी आहे असे समजून सर्व भाजप नेते व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.                                                 

    काल झालेल्या चर्चेनंतर आम्ही कुठल्याही परिस्थितीत भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता मुंदडा यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करुन विजयाचा गुलाल उधळून दाखवू असा शब्द प्रमुख कार्यकर्त्यांनी लोकनेत्या पंकजा मुंडे यांना दिला आहे.                                                  

    लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या घरी झालेल्या बैठकीला भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी, संतोष दादा हांगे, रमाकांत बापू मुंडे, विजयकांत भैय्या मुंडे, विष्णू भाऊ घूले,व राणा डोईफोडे हे मातब्बर नेते मंडळी उपस्थित होते.
    close