shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारचा अधिकृत उमेदवार नसल्याने पदाधिकारी प्रहार सैनिक संभ्रमात

 
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करू:- ता. उपप्रमुख सोमनाथ जाधव

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २/ करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन महाशक्ती मधून प्रहार जनशक्ती पक्ष/ शेतकरी संघटनेचा अधिकृत उमेदवार नसल्याने प्रहार कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा प्रचार करावा याबाबत सर्व प्रहार पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतरच भूमिका स्पष्ट करू असे प्रहार तालुका उपप्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

जाधव म्हणाले करमाळा- माढा मतदारसंघात प्रहार ला उमेदवारी मिळावी निर्णय घेण्यात आला. गेले पाच ते सात वर्षापासून मतदारसंघात अनेक शेतकरी, दिव्यांग, कामगार, तसेच अनेक लोकहिताचे कामे केली आहेत. त्यामुळे बच्चुभाऊ कडू यांच्यावर विश्वास ठेवणारे मतदार संभ्रमात आहेत. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यासंबंधी विचारणा करत आहेत. सोमनाथ जाधव यांनी पुढे सांगितले की, सर्व कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघात जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या आणि प्रहारच्या विचारांशी सुसंगत असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.
close