shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परिक्रमेतून साईऊर्जा चा अनुभव!

🙏परिक्रमेतून साईऊर्जा🙏

विज्ञानाच्या युगातही
घसरतोय आरोग्याचा दर्जा
परिक्रमेच्या माध्यमे
देहा मिळते नवी साईऊर्जा

लागवड मशागत मार्गी
बळी चालला विसरून सर्जा
त्यालाही कृषी कर्मात
असते मिळत नवी साईऊर्जा

परिक्रमा मार्गी मार्गस्थ
हवा उत्पादनास उत्तम दर्जा
लाभत असे उद्योजका
कारखान्यात नवी साईऊर्जा

उन्नतीसाठी स्वरांच्या
संगीतकारा असतो हवा खर्जा
गान गातागाता तया
कामी परिक्रमेतील साईऊर्जा

हरएका असते हवी
जगण्या जीवन उत्तम तर्जा
भक्ती भावाने मिळते
साई परिक्रमेतून नवी ऊर्जा

वाटेवर परिक्रमेच्या
मन म्हणते मुखा नाम गर्जा
साईंच्या नामघोषाने
मिळते परमोच्च साईऊर्जा

ग्रीन अँड क्लीन शिर्डी
संस्थानचाही मोठा सहभाग
परिक्रमेत चालण्यासी
मार्गावर आले भक्त नि प्रभाग

मार्गावर परिक्रमेच्या
साईभक्तांसी मिठाई प्रसाद
अंतर्मनातून शिस्त
मार्गी नाही घडला कुठे वाद

जमला लाखोंचा समुदाय
शिर्डी नगरीचे रुप झाले भव्य
साईंच्या पंढरीत पाहिले
परिक्रमेतून भक्तीचे हे दिव्य

साईकवी -
वसंतकुमार वाणी
शिक्षक, 
श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर
Mob - 9657762291
close