पैठण प्रतिनिधी /
पैठण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पदासाठी बाळासाहेब पठाडे तर सचिव पदासाठी विजय सुते यांनी उमेदवारी अर्ज व्यापारी महासघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले याच्याकडे दाखल केले असून होवू घातलेली निवडणूक ही बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अध्यक्ष पदासाठी पैठणी साडीचे प्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब पठाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शहर सचिव पदासाठी विजय सुते सर यांचा यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब माने, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उगले, तालुका सचिव रामेश्वर सुसे, यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक - नंदू लाहोटी, विजय पापदिवल, नाथ पोरवाल, कृष्णा लोळगे, यांच्या सह सचिव संतोष गोबरे, बाळासाहेब आहेर, लक्ष्मण लबडे, उमेश तट्टू, ज्ञनेश्वर तांबे, गुरुदत्त करकोटक, सतीश करकोटक, सुदाम परदेशी, कृष्णा परदेशी, आनंद बनकर बाबासाहेब साळुंके, गौतम अडसूळ, आकाश परदेशी, केदार परदेशी, संजय कुलथे, महेश कणसे, सोमनाथ अडसूळ, सतीश गव्हाणे, बाळू व्यास, ताराचंद गरड, कुणाल पिंपळे आदी व्यापारी बंधू उपस्थित होते.

