पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा!
मुंबई / प्रतिनिधी:
मुंबईत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने राज्याचे माजी आणि भावी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पत्रकारांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांचा आढावा घेण्यात आला.
महायुती सरकारने पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळाची तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या महामंडळाची मंजुरी दिल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 'दीक्षा भूमी ते मंत्रालय संवाद यात्रा' सुरू करण्यात आली होती, या संवाद यात्रेची माहिती तसेच पत्रकारांच्या २२ मागण्यांवर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले की लवकरच प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या जातील. त्यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी तसेच सोशल मीडियाच्या नियमनासाठी शासन धोरणात्मक निर्णय घेईल, असे सांगितले.
विखे पाटील यांनी पत्रकारांचा लोकशाहीतील योगदान अधोरेखित करताना पत्रकारांना चौथ्या स्तंभाचे महत्त्व पटवून दिले. शासनाला नेहमीच पत्रकारांचे सहकार्य लाभले असून, महायुती सरकार पत्रकार हिताचे निर्णय घेत राहील, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आणि दैनिक समर्थ गांवकरी ठाणे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी सुभाष विसे यांच्या शुभहस्ते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ, खोबऱ्याचा हार आणि साईबाबा मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.
संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या मागण्यांसाठी ठोस पावले उचलली जातील, असे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले. ही बैठक पत्रकारांसाठी अत्यंत फलदायी ठरली असून, आगामी काळात शासन पत्रकारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 956117411