शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आमचे नेते मा.देवेंद्रजी फडणवीस आज शपथ घेत आहेत त्यानिमित्ताने शिरडी च्या साईबाबांचे त्यांना आशिर्वाद लाभावेत. यासाठी मा.देवेंद्रजी च्या वतीने शिरडीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व भारतीय जनता पार्टी शिरडी शहराने साई समाधीस महावस्त्र अर्पण केले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन शिंदे,माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर,विनोद संकलेचा, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, अशोक गोंदकर,गणेश जाधव,पंडित गुडे,सोमराज कावळे,मंगेश खांबेकर विनायक रत्नपारखी ,विजय गोंदकर आदिंसह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते