शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
राजकीय बातमी
राज्याचे उपमुख्यमंत्री पदी अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या संकल्पनेतून ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची अतिश बाजी करून एकमेकास पेढे भरवून अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा जल्लोष व आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एकच वादा उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता या दरम्यान साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुद्धा पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या आनंदात भर घातली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अजित दादा पवार यांनी सलग सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या आनंदा प्रित्यर्थ शिर्डी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिर्डी नगरपरिषद कार्यालय समोर एकत्रित येऊन ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत मिठाई वाटून मोठा जल्लोष व आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी कार्यकर्त्यांनी अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच वादा अजित दादा या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता हा जल्लोष व आनंदोत्सव शिर्डी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर यांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब होते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते युवक नेते अमित शेळके युवक अध्यक्ष निलेश शिंदे सुशांत अवताडे अमोल सुपेकर साई कोतकर चंद्रभान बनकर कैलास कानडे अन्सार शेख राकेश भोकरे शंकर त्रिभुवन गंगाधर वाघ चंद्रकांत जाधव निलेश सुरडकर संजय खोतकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिर्डी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे स्पष्टवक्ता व कर्तबगार नेता म्हणून बघितले जाते त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मोठ्या संख्येने आमदार निवडून आणून राज्यात ताकद दाखवून दिली व खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आपले असल्याचे अधोरेखित केले आहे शहर असो अथवा ग्रामीण भाग सर्वसामान्य पासून मोठ्या पदावर असणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करतायेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करण्यासाठी युवक व कार्यकर्त्यांना नेहमीच उत्साह असतो आमचे नेते अजित दादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने राज्यातील जनतेला त्यांच्या माध्यमातून मोठा न्याय मिळेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही साथीने अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून अधिक प्रभावीपणे कामकाज करून राज्यातील रखडलेले प्रश्न सोडविण्यात व शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताचा कारभार करण्यासाठी यशस्वी ठरतील अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर यांनी दिली