श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राष्ट्रीय संघर्ष समिती, अहिल्यानगर (अहमदनगर) राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे सुचनेनुसार नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचे निवासस्थानी जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करुन खासदार .
लंके यांना निवेदन देवून पेन्शनवाढीची चर्चा केली.त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लोकसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार व दिल्ली आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा पारनेर तालुकाध्यक्ष यशवंत औटी,अयुबभाई शेख यांच्यासह १८/१९ जण उपस्थित होते.तसेच पूर्व सुचनेनुसार खासदार यांचे अहमदनगर येथील कार्यालयासमोर २३/२४ पेन्शन धारकांनी दोन तास धरणे आंदोलन केले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111