बाबासाहेब,
तुम्हीच आमचे मायबाप
तुम्हीच संविधानाचे शिल्पकार
तुम्हीच प्रेरणेचे उगमस्थान
तुम्हीच आमचे आदर्श महान
बाबासाहेब, या परतुनी पुन्हा एकदा!
बाबासाहेब,
सर्व काही मिळाले आम्हा
तुमच्याच कर्तृत्ववाने
गुलामीची तुटली बंधने
तुमच्याच पराक्रमाने
क्रांतीची मशाल हाती घेऊन
मिळवून दिले हक्क सर्व
बाबासाहेब,
तुम्हीच पेरली माणुसकी आमच्यात
हरवलेल्या, गांजलेल्या देहात- मनात
प्रकाशाची किरणे भरलीत ठासून
अंधकारमय काळोखाच्या आतून
तुम्हीच घेतली लेखणी हातात
आणि घडवला इतिहास क्रांतीचा
देवदूत नसूनही दिला तुम्ही
मंत्र आम्हाला माणवतेचा !
बाबासाहेब,
तुम्हीच शिकवले आम्हाला
आकाशात उंच भरारी घ्यायला
अखिल मानवजातीच्या कल्याणा
हाती घेतला क्रांतीचा धगधगता निखारा
तुमच्याच सामर्थ्याने झालोत आम्ही
अंधारातील चमकणारी प्रकाश वाट
तुम्हीच या देशाचे भारतरत्न
घडवला क्रांतीकरी इतिहास !
बाबासाहेब,
या परतुनी पुन्हा एकदा
या विश्वाला तुमची गरज आहे
भरकटलेल्या बेधुंद समाजाला
योग्य दिशा दाखवायला
देशाचे संविधान रक्षण्याला
शांतता, सुव्यवस्था स्थापण्याला
महागाईचा महापूर कमी करायला
दंगे, मोर्चे ,अत्याचार थांबवायला
तुम्ही हवे आहेत बाबासाहेब
या भारत देशाच्या जनतेला
बाबासाहेब,
या परतुनी पुन्हा एकदा
कवयित्री
नम्रता अनिल खंदारे ( शिक्षिका)
रा, पंचशील नगर,परतुर
जिल्हा- जालना