न्याहाळोद:- ता.जि.धुळे येथे दिनांक २६/१/२०२५ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.बोगस विवाह प्रमाणपत्र बद्दल देखील प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी चर्चा केली की,विवाह प्रमाणपत्रावर सही करण्याचे अधिकार फक्त शासकीय अधिकारी सब रजिस्टर व सरपंचांना दिलेला आहे.तसेच दोन्ही पक्षाच्या आई-वडिलांची सही देखील बंधनकारक आहे. संविधानातील तरतुदीच्या अनुषंगाने भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याच्या संस्कृती,परंपरा आणि जीवनशैलीचे जतन व पालन करण्याचा अधिकार प्रदान केला आहे.यामध्ये कलम २९(१) नुसार विशिष्ट जमातीला त्यांची सांस्कृतिक वेगळेपण टिकून ठेवण्याचा अधिकार आहे.हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार विवाहामध्ये दोन्ही पक्षांची संमती आवश्यक आहे.परंतु माता-पित्यांची संमती नसेल तर यामुळे कौटुंबिक ताणतणाव निर्माण होतो.बरेच आई वडील आत्महत्या देखील करतात.समाजात त्यांची मानहानी होते.समाजाची/संपूर्ण गावाची गावोगावी बदनामी होते.फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहिता आयपीसी कलम ४१५ आणि ४२० नुसार कारवाई केली जाऊ शकते.खोट्या संमतीच्या आधारे विवाह केले गेले तर ही कलमे लागू होतात.म्हणून विवाह प्रमाणपत्र संबंधित कायदेनुसार सत्यता तपासणे गरजेचे आहे.
असे असताना देखील महाराष्ट्रात काही विवाह संस्था १५ ते २० हजारात किंवा गिर्हाईकाच्या ऐपतीनुसार पैसे घेतात.त्या विवाह प्रमाणपत्रावर वधू-वरांचा फोटो लावतात व दोघांच्या सह्या घेतात आणि संस्था चालकांची सही असते तसेच शंभर रुपयांच्या दोघांच्या संमतीचा स्टॅम्प करून त्यावर वधू-वरांचा फोटो लावतात.स्टॅम्प व विवाह प्रमाणपत्र व वधू-वरांकडे देतात व त्यांना त्या गावाच्या पोलीस स्टेशन मध्ये जायला सांगतात.त्यावेळी त्या मुलीला हिप्नॉटिझमचे शिक्षण दिलेले असते ती स्वतःच्या आई-वडिलांना/नातेवाईकांना देखील ओळखत नाही.त्यांच्याबरोबर घरी यायला तयार होत नाही.हे लग्न शंभर टक्के बेकायदेशीर असते. अशी लग्न होऊ नये. म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव करावा व याच्यावर उपाययोजना करावी व बोगस लग्नांना प्रतिबंध करावा. कारण प्रत्येक जाती जमातीत मुली आहेत प्रत्येकाचा बाबतीत अशी घटना घडू शकते म्हणून सावधान राहावे.असे आव्हान आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी केले आहे.
या ग्रामसभेला खालील मान्यवर उपस्थित होते.सरपंच कविता वाघ, प्रकाश वाघ, उपसरपंच आबा चौधरी,विकास पवार सर, ग्रामसेवक प्रमोद पाटील, मंडळ अधिकारी छोटू पाटील, तलाठी सतीष परदेशी,निलेश माळी, पत्रकार विशाल रायते, विलास पुराणिक, शिवाजी रोकडे, देवा अण्णा उर्फ देविदास रायते,प्रा. संतोष कढरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.