shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीक्षेत्र कन्हेरे येथे शित शवपेटी अर्पण सोहळा उत्साहात संपन्न.

श्रीक्षेत्र कन्हेरे येथे शित शवपेटी अर्पण सोहळा उत्साहात संपन्न

एरंडोल
– श्रीक्षेत्र कन्हेरे येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जि. प. शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहनाचा समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून व्यावसायिक देवाजी बळीराम पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या हस्ते ध्वजारोहन केले आणि त्याचवेळी शित शवपेटी अर्पण सोहळा देखील झाला.

कन्हेरे येथील रहिवासी आणि सध्या कुसूंबा (जळगांव) येथे राहणारे व्यावसायिक देवाजी बळीराम पाटील यांना त्यांच्या जन्मभूमीत शवपेटीची असलेली गैरसोय लक्षात आली. त्यामुळे, त्यांनी स्वखर्चाने त्यांचे वडील कै. बळीराम तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मदतीने शित शवपेटी तयार करून अर्पण केली.

या कार्यक्रमामुळे गावातील लोकांच्या मनात समाधान व्यक्त झाले. देवाजी पाटील यांच्या दातृत्वामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानले गेले. या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ, तसेच तरुण मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


close