shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध-शेतकरी नेते मारोती गिते

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

मागील काही दिवसांपुर्वी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा काढून देतो तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही.मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा दिला असं वक्तव्य करून राज्यातील शेतकऱ्यांना भिकाऱ्या पेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न केला त्या वक्तव्याचा मी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो असे मत शेतकरी नेते मारोती गिते यांनी व्यक्त केले.




 शेतकरी हा या देशाचा राजा मानला जातो मात्र सत्तेच्या मग्रुरीत हे वक्तव्य अगदी चुकीच्या पद्धतीने केले आहे. यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांच्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे कारण माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे आणि पोशिंदाला भिकारी म्हणून हिनवणे एकदम चुकीचे आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या सन्मानाला ठेच लागलेली सहन करून घेणार नाही एक तर सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला नाही पिक विम्याची रक्कम वेळेवर दिली नाही शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन निर्यातीचे धोरण ठरवले नाही.

जो तो कोणी राजकारणी येतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतो आणि शेतकऱ्यांना कमी लेखतो आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक दुर्बल बनवून पुन्हा जखमेवर मीठ चोळले जाते.आपला भारत देश एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो मात्र येथील राज्यकर्ते शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या खड्ड्यात लोटण्याचे काम करताना दिसता. कारण जो सोयाबीनचा भाव आज आहे तो भाव दहा वर्षांपूर्वी दिला जात होता तोच भाव आज देतात शेतकऱ्यांचे हित पाहून आयात निर्यातीचे धोरण ठरवताना दिसत नाही आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणून हिणवण्याचे काम  करतात.शेतकऱ्यांना दाम दुप्पट करू अशी घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात दाम दुप्पट तर सोडा मात्र आज घडीला शेतकरी राजा चौपट माघे गेला यांचं कारण आयात निर्यातीचे धोरण शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक  आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर गदा आणली जात आहे. हे आम्ही राज्यातील शेतकरी कदापी ही सहन करणार नाही असे मत शेतकरी नेते मारोती गिते यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

close