नगर / प्रतिनिधी:
सावित्री फातेमा सद्भावना विचारमंचतर्फे सर्व धर्मीय राज्य सद्भावना संमेलनाचे
शनिवार दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी नगरमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष ऍड. संभाजी बोरुडे व समन्वयक डॉ. रफीक सय्यद यांनी दिली.
हे संमेलन नगर शहरातील नगर शहरातील जुन्या कलेक्टर ऑफिस जवळील सैनिक लॉनमध्ये दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. देशात धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही सामाजिक गट करीत असताना सामान्य नागरिकांनी सर्वसमावेशक व सहिष्णू भूमिका घ्यावी व देशहित समोर ठेऊन सद्भावना प्रस्थापित करता यावी यासाठी जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन सावित्री फातेमा सद्भावना विचार मंचची स्थापना केली.अशी माहिती मंचचे सचिव मुबिन शेख यांनी दिली.
यावेळी प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा राज्यस्तरीय सद्भावना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या सद्भावना संमेलनात पारनेर येथील ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. सोपानकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज सावंत (परभणी), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी), ह.भ.प विठ्ठल आबा महाराज मोरे (पुणे), मौलाना इंजिनिअर सलीम साहेब (दिल्ली),भंते बाळासाहेब पातारे (पारनेर), मौलाना समी साहेब (जळगाव), कॉम्रेड स्मिताताई पानसरे, हरजित सिंह वधवा, शगुफ्ताताई शब्बीर मोमीन (पारनेर) आदींचे मार्गदर्शन होणार आहे.अशी माहिती अशोक सब्बन यांनी दिली.
देशात सद्भावना द्विगुणीत करण्याचे कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन सावित्री फातेमा सद्भावना मंचा तर्फे संजय झिंजे व फिरोज शेख यांनी केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

