shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोरगरीब लेकराला आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद नाही- मनोज जरांगे

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

सेनगांव तालुक्यातील आजेगाव येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या शुभहस्ते दि.१८ फेब्रुवारी मंगळवार रोजी करण्यात आले.मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांना आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद नाही असे मत यावेळी शिवप्रेमींना बोलतांना मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले.


तालुक्यातील आजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या अनावरणासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांना आमंत्रीत करण्यात आले होते.यावेळी जरांगे-पाटील यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करतांना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की,एकजुटीत किती ताकद आहे हे आपण दाखवुन दिलेत.

हा समाज एकत्र आला पण गाव खेड्यातल्या गोरगरीबांच्या अडचणी आणि समस्या खुप आहेत नुसते एकत्र येणे उपयोगाचे नाही तर एकत्र आलोत एकत्र आल्याचे योगदान वाया जावु दिले नाही.समाजाला आरक्षण मिळवुन दिले राहीलेले सुध्दा मिळेल गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण मागणे म्हजणजे जातीवाद नाही.समाजाला एकच सांगणे व्यसनापासून लांब राहा व एकजुट राहा आपली प्रगती कोणी ही रोखु शकणार नाही असे मत उपस्थित शिवप्रेमींना बोलतांना व्यक्त केले.यावेळी संत,महंत,जेष्ठ नागरीक,राजकीय नेते,पदाधिकारी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

close