--------------------------------
*विद्यार्थ्यांनी पौष्टिक आहार पदार्थांचे दाखवले प्रदर्शन*
--------------------------------
*प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी* :- केज शहरातील अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटावणाऱ्या लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये शनिवार रोजी पोषण आहार दिना निमीत्त
या नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पौष्टिक आहार पदार्थांचे प्रदर्शन दाखवले . हा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
केज शहरातील बीड रोडवरील लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये पोषण आहार दिना निमीत्त विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व रुजवण्यासाठी लक्षमी नर्सिग स्कूलमध्ये दि.१५ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमांचे उध्दघाटन संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे, माजी जि.प.सदस्या उषाताई मुंडे यांनी केले व या कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देणारी विविध नाटके सादर केली.त्यांनी संतुलित आहाराचे फायदे,जंक फूडचे दुष्परिणाम आणि पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांनी तयार केलेले पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या प्रदर्शनात विविध प्रकारची फळे,भाज्या,
धान्ये आणि पौष्टिक स्नॅक्स मांडण्यात आले होते.या स्कूलच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले आणि जंक फूड टाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आहारात फळे,भाज्या आणि धान्यांचा समावेश करण्याचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मिळून पौष्टिक पदार्थ तयार केले आणि त्यांच्यासोबत आहाराच्या सवयींवर चर्चा केली.या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व वाढवणे.संतुलित आहाराच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे.
जंक फूडच्या दुष्परिणामांबद्दल माहिती देणे.पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व पटवून देणे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पौष्टिक आहाराचे महत्त्व जाणून घेतले आणि त्यांच्या आहारात सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे, माजी जि.प.सदस्या उषाताई मुंडे,सेवासोसायटीचे चेअरमण मधुर (भैय्या)मुंडे यांच्यासह अनेक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रवि पवार आणि नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी , विद्यार्थीनी व कर्मचारी सोनवणे ताई यांनी परिश्रम घेतले.

