सौ.किरण वाघ / देऊळगांव राजा
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. यावेळी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश कायंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहत्रे प्रा.मंगेश धांडे, प्रा. योगेश चगदाळे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी किरण ठाकरे, विशाल बंगाळे व रा.से.यो. स्वयंसेवक यांनी वृक्ष पूजन करून होळी साजरी केली.
कर्मयोगी स्वामी शुकदास महाराज यांनी होळीच्या दिवशी लाकडाची होळी न करता वृक्ष पूजन करावे असा मार्मिक संदेश देत या अनोख्या प्रथेला सुरुवात केली, त्याच संदेशाचे स्मरण करून समर्थ कृषी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्ष पूजन करून होळी साजरी करण्यात आली. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल तसेच होळी निमित्ताने सर्व रा से यो विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण करून त्याचे संगोपन करू अशी शपथ घेतली.
होळी हा सण रंग, आनंद आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे जे आपल्याला शिकवते की सर्व अडचणी सहन केल्यानंतर सत्य आणि सद्गुण शेवटी जिंकतात.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार
अजीजभाई शेख - राहाता
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111