shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज जामखेड शहरात जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा


जामखेड प्रतिनिधी:

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा रविवार दि. 16 मार्च 2025 रोजी जामखेड शहरातील हॉटेल सुंदराईच्या मागे, कोठारी पेट्रोल पंपाजवळ,कर्जत-जामखेड कॉर्नर, नगररोड,जामखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी या महन्मंगल समयी तालुक्यातील सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरीवार कार्यक्रमास उपस्थित राहुन पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन स्व-स्वरुप संप्रदाय दक्षिण अहिल्यानगर भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
      कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 10 वाजता जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांची जामखेड शहरातून भव्य मिरवणूक काढून होणार असून नंतर पादुका कार्यक्रमाच्या संत पिठावर विराजमान होतील यानंतर गुरुपूजन , आरती , प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी इत्यादी कार्यक्रम होणार आहे.

       जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेहमी लोकपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य वाटप, संस्थांनच्या वतीने 53 ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि श्री क्षेत्र नाणीजधाम येथे 24 तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे. गोर-गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते, औषधे, शेती अवजारे वाटप केली जातात, दुष्काळ पडल्यास संस्थांनच्यावतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो.
अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले जाते. निराधार महिलांना शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्या दूभत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते. अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा, पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्व- स्वरूप संप्रदाय दक्षिण अहिल्यानगर भक्तसेवा मंडळच्यावतीने करण्यात आले आहे.
close