राजकारणामध्ये काम करताना तुमची स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे : माधुरी मिसाळ
इंदापूर : राजकारणामध्ये काम करताना तुमची स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे , नेत्याच्या ताकदीवर तुमचं राजकारण कधीच होत नाही. तुमची स्वतःची ताकद निर्माण करा तर राजकारणातील नेत्यांना तुमची गरज पडली पाहिजे . ही गोष्ट लक्षात ठेवून राजकारणामध्ये काम करताना, युवा कार्यकर्त्यांनी तुमची स्वतःची ताकद निर्माण करावी. तेव्हांच तुम्हाला किंमत तयार होणार असल्याचे मत, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी इंदापूर येथे नागरी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
स्वर्गीय सतिश शेठ मिसाळ मित्र परिवार व प्रदीपदादा गारटकर मित्र परीवार इंदापूर तालुका यांच्या वतीने, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांचा नागरी सत्कार शनिवार ( दि. १५ ) रोजी सायंकाळी इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित केला होता. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने, संजय नाईक, संजय सोणवणे, विधीज्ञा सुधीर पाटसकर, करण मिसाळ यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.
पुढे बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक महिला असते. अशीच आमची महीला अनुराधा यांनी प्रदिपदादा गारटकर यांना खंबीर साथ दिली. आम्ही काॅलेजमध्ये असताना, पतित पावन संघटनेची स्थापणा केली. या सत्काराला उत्तर काय द्यायचे तर नुसते इंदापूरच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही गेले तरी मला सतीश शेठची आठवण सांगणारी माणसं भेटतात, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येते आणि मला अभिमान वाटतो की, सतिशची बायको आहे. त्याचे सर्व मित्र गेली २२ वर्षे माझ्याबरोबर राहून मला साथ देत आहेत. माझ्यासाठी ही फार महत्वाची बाब आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, मी गृहीणी होते. तेव्हा इंदापूरला खास आवर्जुन मासे खायला यायचे. इंदापूरला आल्यानंतर वाशिंबेकर बापुंची आठवण आल्याशिवाय रहात नाही. लोकांची जी जवळीक होती ती आजपर्यत जपलेली आहे. लोकांनी सांगितल्यामुळे मी सतिशची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी घराच्या बाहेर पडले. लोकांच्या आग्रहाखातर व पाठींब्यामुळे मी उभी राहु शकले. सगळ्या जातीधर्मांतील लोकांना सोबत घेवून मी चार वेळा निवडून आले. कै.सतिश शेठ यांना जावून २२ वर्षे झाली, तरी तुम्ही सर्वांनी हे नाते जपले व माझा नागरी सत्कार केला. त्याबद्दल मी सर्व इंदापूरकरांचे मनापासून आभार मानते.
---------------------------------------------
चौकट:
कै. धनंजय वाशिंबेकर बापू व सतीश सतीशशेठ मिसाळ यांची मैत्रीचे नाते प्रदीप गारटकर यांनी चांगले निभावले - मंत्री दत्तात्रय भरणे.
पुणे तेथे काय उणे असे म्हणत पुणेकर कट्ट्याचे अभिनंदन केले. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या कामाची पद्धत व सामाजिक जिव्हाळा मी पाहत असतो. माधुरी ताईंचे सासर पुणे असले तरी माहेर मात्र इंदापूर असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. 2019 ला राज्यमंत्री असताना मी चांगले काम केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातून निधी आणण्यासाठी आमचा चांगला प्रयत्न राहणार आहे परंतु त्याबाबत नागरिक यांनी गैरसमज करून घेऊ नका नागरी सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत कै. धनंजय वाशिंबेकर बापूंची आठवण नेहमीच येत असल्याचे सांगत कै. धनंजय वाशिंबेकर बापू व सतीश सतीशशेठ मिसाळ यांची मैत्रीचे नाते प्रदीप गारटकर यांनी चांगले निभावल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले.
---------------------------//-
चौकट:
मित्रांच्या आठवणीने प्रदीप गारटकर यांना झाले अश्रू अनावर
मी जर पुण्याला काही कामाने गेलो आणि त्यात सतीश शेठ मिसाळ यांच्या घरी गेलं तर आत्ताच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ ह्या नाष्टा केव्हा जेवण केल्याशिवाय कधीही माघारी पाठवत नव्हत्या. त्यावेळी त्या सामान्य गृहिणी होत्या. सामान्य गृहिणी ते बघता बघता त्या राज्याच्या सात खात्याच्या राज्यमंत्री झाल्या. त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. सतीश शेठ मिसाळ त्यांच्या आठवणी अनंत आहेत. त्याची मैत्री जपण्याचा प्रकार आताच्या काळातल्या कोणत्याच मित्राला शक्य नाही. कुठल्याही राजकीय व सामाजिक संघटनेचा विचाराचा कार्यकर्ता असला तरी तो सतीश शेठ मिसाळ यांच्या विचाराचा असायचा. तेच संस्कार मी जपले आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रदीप गारटकर यांचे सतीश शेठ मिसाळ व कै. धनंजय बापू वासिंदेकर यांच्या आठवणीने कंठ दाटून आला.
--------------