शहा ग्लोबल स्कुलमध्ये होळी व धुलिवंदन साजरा.
चित्र रंगरंगोटी व सुरेल गीतांचा अनोखा रंग
इंदापूर : इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूलमध्ये यंदा अनोख्या पद्धतीने होळी व धूलिवंदन सण साजरा करण्यात आला. शिक्षणाबरोबर संस्काराने संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी, विविध चित्र रेखाटन करून रंगाचा आनंद घेत होळी सण साजरा केला.
अंगद शहा म्हणाले की, राज्यभर देशभर होळी सणाला मोठे महत्त्व आहे. बाल वयातच या सणाचे महत्त्व आपल्या
शैक्षणिक घडामोडीत आनंदात कसे घालवायचे याचे धडे शहा ग्लोबल स्कूलच्या वतीने देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण विविध चित्र रेखाटन केले. तसेच रंगकामही केले.
होळीच्या गाण्यावर नृत्य करीत बालकांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या शिक्षका ऋतुजा महाजन यांनी तर स्कूलच्या संचालिका रुचिरा शहा यांनी आभार मानले.