इंदापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ हवेली गावठाण, दोशी वस्ती, शिंदे वस्ती व चव्हाण वस्ती येथील विद्यार्थीना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांना, जय काळभैरवनाथ विविध विकास कार्यकारी सोसायटी शेटफळ हवेली, देवपूजा ग्रामीण पतसंस्था इंदापूर, धारिका डेअरी शेटफळ, जय काळभैरवनाथ मजूर सोसायटी, श्रावणी कलेक्शन इंदापूर, गणेश बाग दत्तनगर इंदापूर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत, राजकारणात काम करत असताना समाजकारणाला अधिक महत्व द्यायचे असते. तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्य उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत.