लोकं
बरं बोललं की
भाळतात लोकं !
खरं बोललं की
टाळतात लोकं !!
जाणून घेतलं की
कळतात लोकं !
प्रामाणिकपणे वागल की
छळतात लोकं !!
ओल्यालाही सुक्या
बरोबर जाळतात लोकं !
माणुसकीतही कंजूशी
पाळतात लोकं !!
नशिबानेच चांगली
मिळतात लोकं !
चांगल्या नशिबावरही
जळतात लोकं !!
दुःखाचे कढ आतल्या
आत गिळतात लोकं !
अनोळखी असूनही प्रेमाने
जुळतात लोकं !!
आपल्याच माणसांची
चर्चा चघळतात लोकं !
अरिष्ट येता परके बनवून
न्याहाळतात लोकं !!
वास्तव विसरून दिखाव्याला
भाळतात लोकं !
खोटीच सहानुभूती अन्
खोटे आसू गाळतात लोक !!
प्रलोभानापुढे कित्येक
पघळतात लोकं !
सज्जनाला चंदनाप्रमाणे
उगाळतात लोकं !!
मदतीची गरज असली की
दूर पळतात लोकं !
सगळं चांगलं झालं की
येऊन मिळतात लोकं !!
लेखन: सुजाता पुरी
अहिल्यानागर - 8421426337
संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111