shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंचित स्त्रियांनी कायद्याच्या आधारे मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन आरोग्यपूर्ण जीवन सन्मानाने जगावे - प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 वंचित स्त्रियांनी कायद्याच्या आधारे मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन आरोग्यपूर्ण जीवन सन्मानाने जगावे असे प्रतिपादन तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले. श्रीरामपूर येथील स्नेहालय संचलित स्नेहज्योत युनिट क्रमांक २ च्या महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

त्या पुढे असेही म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक कार्यक्रमात सकारात्मक सहभाग घ्यावा आणि आपला विकास करावा. आधार कार्ड,रेशन कार्ड काढून घ्यावे. मुलांना शाळेत घालावे.मानवी हक्कांपासून वंचित राहू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुणाच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नये. कुणाची जबरदस्ती चालवून घेऊ नये.भाजीपाला विकणे, लग्न समारंभात वाढपी म्हणून काम करणे यांसारखे अनेक कामे करुन सन्मानाने‌ जगावे. या विषम व्यवस्थेला बळी पडू नये. आपल्या अज्ञानाचा कुणाला फायदा घेऊ देऊ नये. आपले शारीरिक,आत्मिक आणि मानसिक आरोग्य सांभाळावे असेही त्या म्हणाल्या. ऍड. प्रसन्न कुमार बिंगी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक महिलेने सर्वार्थाने सक्षम व्हावे. स्नेज्योतच्या प्रत्येक सकारात्मक कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक करावी.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या लिलाबाई खंडागळे यांनी भूषवले. स्नेह ज्योत युनिट २ प्रकल्पाचे समुपदेशक राहुल भोसले यांनी सूत्रसंचालन केले. क्षेत्रीय अधिकारी वामन सूर्यवंशी, हर्षद हगवणे, आकाश जावळकर तसेच संस्थेच्या पीयर वैशालीताई घारे, लताताई बोंद्रे ,आरतीताई जावळकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी स्नेह ज्योत युनिट २ मधील सर्व महिला उपस्थित होत्या.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close