अजीजभाई शेख / राहाता
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शैक्षणिक संकुलातील कन्या विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी यादवराव वडघुले आणि स्मिता उत्तमराव चाबुकस्वार यांना संगमनेर येथील विद्या विद्यापीठ संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
संगमनेर येथील विद्या विद्यापीठ संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्याची दखल घेऊन विद्यार्थी ज्ञानदानाप्रती घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आदर्श शिक्षिका म्हणून ही निवड करण्यात आली आहे. नुकताच महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पद्मश्री कल्पनाताई सरोज यांच्या शुभहस्ते सौ.दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरयू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित या आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे, प्राचार्य संजय ठाकरे, मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, उपप्राचार्य अलका आहेर यांच्यासह तिन्ही विभागातील शिक्षक बंधू-भगिनी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111