shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंडाकोन 2025 इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर, जिल्हा पुणे ब्रांचच्या राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद दिमाख्यात संपन्न.यु ट्यूब ब्रॉडकास्ट वर जगभरातून चार हजार डॉक्टरांनी नोंदवली उपस्थिती .

इंडाकोन 2025 इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर, जिल्हा पुणे ब्रांचच्या राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद दिमाख्यात संपन्न.
यु ट्यूब ब्रॉडकास्ट वर जगभरातून चार हजार डॉक्टरांनी नोंदवली उपस्थिती .
इंदापूर : इंडाकोन 2025 इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर, जिल्हा पुणे ब्रांचच्या राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद दि. 7,8,9 मार्च रोजी संपन्न झाली.

दिनांक 7 मार्च रोजी डॉ.अनिकेत इनामदार_अकलूज यांच्या उपस्थितीत (C. P. R) व डॉ सचिन फिरके कोल्हापूर यांच्या एव्हरेस्ट बेस कॅम्प  (COPD) कार्यशाळा संपन्न झाली. 

दिनांक 8 मार्च रोजी व 9 मार्च रोजी विविध विषयांवरील 40 तज्ञ वैद्यकीय  चे प्रेझेंटेशन सादर झाले. त्यासाठी यु ट्यूब ब्रॉडकास्ट  वर जगभरातून 4000 डॉक्टरांनी उपस्थिती नोंदवली, तसेच चार ओरेशन चर्चासत्र
1. स्वर्गीय गोकुळदास शहा स्मृती ओरेशन,
2. चंदुकाका सराफ ओरेशन,
3. डॉक्टर नीतू मांडके ओरेशन,
4. स्व पद्मश्री मनोहर डोळे ओरेशन पार पडले.
5. स्व.डॉ आर.डी. लाळे .

दि. 8 मार्च रोजी मीडिया, पोलीस ,मेडिकल प्रॅक्टिस या विषयावर पॅनल  चर्चा  खालील मान्यवरांच्या उपस्थित पार पडले 
1. डॉक्टर . संतोष कुलकर्णीi (Presi Elect.IMA MS)
2. डॉक्टर संतोष काकडे  Ex member M.S consume despute commission)
3. डॉक्टर अतुलचंद्र कुलकर्णी  ( former SPI.DG.)
4. डॉक्टर स्वप्निल लाळे   - Director health services M.S
5. सारंग दर्शाने  - SR journalist MH Time's 
यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर कोकणे व पत्रकार बंधू उपस्थित होते. याआधी डॉ अलका मांडके व डॉ उमा प्रधान यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. दि. 8 मार्च रोजी सायंकाळी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. यामध्ये सर्व कमिटी मेंबर्सला उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष डॉ अनिल शिर्के यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. चेअरमन डॉ अविनाश पाणबुडे यांनी आय एम ए इंदापूर इंडिकॉन चे महत्व विशद केले.

पेट्रन डॉ. राम अरणकर व सर्वच मान्यवरांनी आयोजकांचे परिषदेच्या यशस्वी ते बद्दल कौतुक केले.

इंदापूर सारख्या नीम शहरी भागात असूनही ऑनलाइन  व फिजिकल कॉन्फरन्स   एक मानदंड ठरली. आय एम ए एम एस  चे माजी अध्यक्ष डॉ अशोक तांबे, डॉ कुटे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन व अभिनंदन केले.

डॉ सुधीर तांबिले (सेक्रेटरी) यांनी आभार प्रदर्शन केले.
 इंडिअकॉन 2025 च्या यशाचे श्रेय सर्व सदस्यांना देत संयोजकांनी सर्वांना धन्यवाद दिले.
close