shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई बसस्थानक परिसरात राहुरी शिंगणापूर रस्त्यावर हाणामारी 13 जणांवर गुन्हा दाखल.


प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
 शनिवार दि 15 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान सोनई बसस्थानकासमोरील राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यांवर दोन गटात हाणामारी झाली त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती शनीवार असल्याने शशी शिंगणापूरला येणार्या भाविकांची संख्या जास्त असल्याने वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या दोन गटात झालेल्या वाद आणि हाणामारी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 13 जनावरं गुन्हा दाखल करण्यात आला आहे बसस्थानक परिसरात रस्त्यावर बारगळ हाॅस्पीटल समोर रस्त्यावर हा हाणामारीचा प्रकार घडल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यांवर 15 मिनिटे वाहतुक कोंडी झाली होती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

     पोलीस आल्याचे समजताच हाणामारी करणारे युवक घटनास्थळावरुन पळून गेले पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर आघाव यांच्या फिर्यादीवरून समर्थ संजय तारडे,विनायक विठ्ठल पाटोळे ,गणेश भाऊसाहेब जाधव, कृष्णा पाटोळे // पूर्ण नाव माहित नाही//गणेश सुभाष बनसोडे, अविनाश राजेंद्र पाटोळे, अक्षय दिलीप जाधव, रिहान शेख//पूर्ण नाव माहित नाही//सार्थक संजय तारडे सर्व राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी तर प्रकाश एकनाथ तागड, प्रमोद गणेश ढोबळे, मोहित ढगे/पूर्ण नाव माहित नाही/आदित्य दहिफळे राहणार सोनई तालुका नेवासा वरील युवकांवर सोनई पोलीस ठाण्यात गु र न 76/2025 भा द वी कलम194/2 सह महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 110/117 गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सोनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बी जी बाचकर अधिक तपास करत आहेत.
close