शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:
आष्टी:- आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी श्री आबासाहेब दिलीपराव खिलारे यांना राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाचे २०२३ आणि २०२४ या वर्षाचे राज्यस्तरीय राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत.
यामध्ये सन २०२२-२०२३ चा आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आबासाहेब खिलारे यांना छत्रपती संभाजी नगर विभागातून जाहीर झाला आहे.
राज्य शासनाने सन २०२२-२०२३ मधील ३३ आणि तर सन २०२३- २०२४ साठी च्या ३२ ग्रामपंचायत अधिकारी यांना हे पुरस्कार जाहीर केले आहे. हे पुरस्कार यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात वाटप करण्यात येणार आहे. कडा येथील आबासाहेब खिलारे यांनी सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक, अंतरवली तसेच आष्टी तालुक्यातील नांदा ब्रह्मगाव,मुर्शदपुर, टाकळी अमिया येथे सेवा केली व सध्या कडा येथे कार्यरत असलेले
आबासाहेब खिलारे यांचे आष्टी तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच खिलारे यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.