देवळाली प्रवरा - १८ एप्रिल
देवळाली प्रवरा येथील बाबासाहेब रंगनाथ कराळे यांची सूकन्या ऐश्वर्या बाबासाहेब कराळे हिने मुंबई महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या परिक्षेत राज्यभरातून आलेल्या हजारो परीक्षार्थी मधून दहावा क्रमांक पटकावून टॅक्स इन्स्पेक्टर या वर्ग एक च्या पदावर वर्णी लावली आहे. तसेच आठच दिवसापूर्वी एकझिक्युटिव्ह असिस्टंट या पदावर सुध्दा उत्तीर्ण होऊन तिने वर्णी लावली होती. त्यामूळे केवळ आठच दिवसात दोन वेगवेगळ्या पोस्ट मिळवणारी देवळाली प्रवरा मधील ती पहिली मुलगी ठरल्याने तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्या निमित्त देवळाली प्रवरा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने प्रहार च्या देवळाली प्रवरा महीला शहर प्रमुख भाग्यश्रीताई कदम यांचे हस्ते शाल तसेच अल्पावधीत राज्यात नावलौकिक मिळवून विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेले वैभव ढूस लिखीत अंतः असती प्रारंभ हे पुस्तक भेट देऊन तिचा सन्मान करणेत आला.
प्रसंगी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ प्रमूख चंद्रकात कराळे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, देवळाली प्रवरा महिला शहर प्रमुख भाग्यश्री कदम, संपर्क प्रमूख गणेश भालके, बाबासाहेब रंगनाथ कराळे, सिद्धार्थ बाबासाहेब कराळे, लक्ष्मण जगन्नाथ कराळे आदी उपस्थित होते.
प्रसंगी बोलतांना प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस म्हणाले की, कराळेंच्या ऐश्वर्यामूळे देवळाली करांची मान अभिमानाने उंचावली असून पुढील पिढीने तिचा आदर्श घ्यावा व आपले जिवन घडवावे.. ज्यामुळे कुटुंबाचे व गावाचेही नाव मोठे होण्यास मदत होईल व हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील युवा पिढी घडण्यास नक्की मदत होईल.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब रंगनाथ कराळे व त्यांच्या सौभाग्यवती यांनी त्यांच्या ऐश्वर्या व तिच्या दोन भावंडांचे उच्च शिक्षण पुर्ण केले.. बाबासाहेब कराळे यांनी हाणा, मारा, दांडे घ्या, ठेचून काढा, डोळे काढा अश्या पद्धतीच्या गावातील गलिच्छ राजकारण्यांपासुन व त्यांच्या संस्कारापासून स्वतःला आणि मुलांना बाजूला ठेवले.. व मुलांच्या भवितव्यासाठी वेळ दिला म्हणूनच आज ऐश्वर्याने क्लास वन पोस्ट घेवुन केवळ कराळे कुटुंबाचेच नव्हे तर देवळाली प्रवरा गावाचे नाव मोठे केले आहे.
शेवटीं जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देत रे ईश्वर हेच सत्य आहे.. ऐश्वर्याच्या रूपाने आज कराळे कुटुंबाला त्यांच्या आजवरच्या कर्माचे फळ मिळाले असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. असे सांगून ढूस यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चुभाऊ कडू तसेच जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग औताडे, तसेच देवळाली प्रवरा येथील सर्व प्रहार पदाधिकारी आणि समस्त ढूस परिवाराचे वतीने ऐश्वर्याचे अभिनंदन करून तीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.