वडाळा महादेव (प्रतिनिधी):-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती श्रीरामपूर यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वडाळा महादेव येथील कवी गीतकार बाबासाहेब पवार यांना साहित्य क्षेत्रातील योगदान बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाकार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन माजी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव वंचित बहुजन तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.