आज दिनांक २०/४/२०२५ ला नागपूर येथील हैदराबाद हाउस मध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना संघटनांच्या पदाधिकार्यानी हिवताप योजना जैसे थे ठेवण्यास निवेदन दिले व थोडक्यात पार्श्वभूमी निदर्शनास आणून दिली. हिवताप विभागातील अधिकारी व कर्मचार्याच्या सेवाविषयक बाबी दि. २२ नोव्हें २०१९ नुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडे देण्याचे शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे मा. सहसंचालक आरोग्य सेवा (हि.ह व जरो) पुणे यांनी दि. २६ मार्च २०२५ रोजी पत्रक काढून अधिपत्याखालील यंत्रणेला निर्देश दिले आहेत.वास्तविक सदर परिपत्रकावरिल कार्यवाही सहा वर्षापुर्वीच स्थगित केली आहे.त्यामुळे स्थगित केलेली कार्यवाही पुन्हा सुरू करु नये व सदर काढलेल्या पत्रकास स्थगिती द्यावी.
अशी विनंती मा. मुख्यमंत्री महोदयांना उपस्थित संघटनांचे पदाधिकारी यांनी केली. तसेच बायोमेट्रिक फेस रिंडिंग हजेरी आरोग्य विभागातील कर्मचार्यासाठी सोयीची नसल्याची माहिती दिली.यावर माहिती घेण्यास खाजगी सचिव यांना सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य हिवताप (हत्तीरोग) निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री. डी एस पवार व पदाधिकारी श्री दीपक गोतमारे ,श्री डोंगरे, श्री संजय आमटे, श्री प्रवीण शिखरे, जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती विशाखा पाठक यांनी बाजु मांडली. सोबत हत्तीरोग अधिकारी श्रीमती मोनिका चारमोडे हत्तीरोग संरक्षण पथकाच्या अधिकारी श्रीमती मानकर मॅडम,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे श्री सुनील कोरे, कृष्णा अवधूत, श्री Including आदी पदाधिकारी उपस्थित होते.