महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री आर. एन. सोनार व प्रदेश सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांनी दि. १ं६ /०४/२०२५ रोजी मा. ना श्री.प्रकास आबिटकर साहेब यांची त्यांचे बंगल्यावर जावुन भेट घेतली , . त्यांना हिवताप योजनेचे जिल्हा परिषद यंत्रणेकडे हस्तांतरण व बायोमेट्रिक फेस रिडिंग हजेरी आरोग्य विभागातील कर्मचार्यावर अन्यायकारक असल्याबाबतचे निवेदन देवुन चर्चा केली.
दि. २२नोव्हेबर २०१९ चे शासन परिपत्रकाचे अनुषंगाने हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या सेवाविषयक बाबी जिल्हा परिषद यंत्रणेकडे हस्तांतरणाने निर्माण होणाऱ्या अडचणी बाबत माहिती दिली. जिल्हा परिषद व राज्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशासनिक स्वरूप वेगवेगळे आहे. जिल्हा परिषद प्रशासनाची कार्यप्रणाली ही ग्रामविकास मंत्रालयाचे अधिनस्त आहे तर हिवताप योजनेची कार्यप्रणाली ही राज्य शासनाचे अधिपत्याखाली आहे.सेवाविषयक नियमही वेगवेगळे असल्यामुळे कार्यान्वित करतांना प्रशासकिय कार्यामधे अनेक अडचणी व गुंतागुंत निर्माण होणार असुन कर्मचार्यावर अन्याय होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सुद्धा अशी प्रक्रिया राबविण्याचे धोरण शासनाने अंवलंबविले होते. त्यावेळेस सुध्दा हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचार्यांवर अन्याय होणार्या सेवाविषयक बाबीची समर्पक माहिती संघटनेने तत्कालीन शासन व प्रशासनानचे निदर्शनास आणून दिले. त्यावर शासनाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आणि अंमलबजावणी थांबविली असल्याची बाब मंत्री महोदयांचे निदर्शनास आणून दिली.
तथापि सहा वर्षापूर्वीच स्थगित केलेली अंमलबजावणी परत शासनाचे निर्देशाप्रमाणे मा. सहसंचालक आरोग्य सेवा (हि,ह व जरो)पुणे ६ यांचे दि. २६ मार्च २०२५ चे पत्रानुसार २२ नोव्हेंबर २०१९ चे शासनाचे परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे अधिपत्याखालील यंत्रणेला निर्देश दिले आहेत.त्यामुळे हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असुन तिव्र नाराजी असल्याची बाब प्रकर्षाने मा.मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. सदरची प्रक्रिया थांबविण्यात यावी अशी विनंतीही केली.
तथापि यावर मंत्री महोदयांनी प्रशासनामध्ये सुसुत्रता आणण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सुतोवाच केले. तसेच बायोमेट्रिक फेस रीडिंग हजेरी बाबतचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. त्यावर हा प्रशासकीय कार्यप्रणालीचा भाग आहे.असे सांगितले.या दोन्ही ज्वलंत व न्याय मागण्यावर संघटनेच्या शिष्टमंडळाची संबंधित खातेप्रमुखासोबत बैठक घेण्याचीही विनंती केली. मा. मंत्री महोदयांनी लवकरच बैठक घेवु असे आश्वासन दिले. सोबत राज्यातील हिवताप कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डी. एस.पवार
सरचिटणीस