काकर सौदागर समाजाचा सामुदायिक
विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !
कोपरगांव / प्रतिनिधी:
कोपरगांव तालुक्यातील भोजडे या गावी काकर सौदागर समाजातील १७ जोडप्यांनी कुबूल कुबूल म्हटले, निमित होते काकर सौदागर समाजाचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे, हज़ारों च्या संख्येने समाज बांधव रखरखत्या उन्हात आवर्जून उपस्थित होता. आयोजकांनी सर्वतोपरी आयोजनात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. पाण्याची व जेवणाची आगदी उत्तम व्यवस्था तसेच मांडवाची देखील व्यवस्था चांगल्या प्रकारे केली गेली होती. या सामुदायिक विवाह सोहळ्यात वैजापूर चे शहर काजी हाफ़िज़ुददीन सदरुददीन सहाब यांनी शुभविवाह कार्याची कार्यवाही पूर्ण केली. त्यांना मौलाना इरफान रजा यांनी साथ दिली.कोपरगांवचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी शुभेच्छा दिल्या. वैजापूरचे शिवसेना नेते साबीर खान यांनी आयोजकांचे तथा सौदागर एकता असोसिएशन सोसायटी व लब्बैक सोशल ग्रुप च्या सर्व सदस्यांचे मोठे कौतुक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष इकबाल इस्माईल काकर यांनी केले. यावेळी काकर समाजाचे प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक (वैजापूर) बिलाल हुसेन काकर, माजी उपनगराध्यक्ष कय्युमभाई सौदागर, बशीर भाई सौदागर, शामीम सौदागर सर, सलीम नज्मी सर, काजीम सौदागर, सईद सौदागर, अख्तर काकर, दरवेश काकर , चारुदत्त सिनगर, श्रीरामपूर विद्रोही संघटनेचे अध्यक्ष डॉ. सलीम शेख, इस्लामवाडीचे माजी सरपंच बाबा काकर,जावेद सौदागर, रउफ सौदागर, असलम सौदागर, आझम सौदागर, हाफ़िज़ सैफी, रहबर-ए कौम चे आरिफ काकर , अल्ताफ काकर , राहुरीचे फिरोज़ काकर , अकोल्याचे इब्राहिम काकर , सांडू काकर व सरपंच फिरोज काकर , श्रीरामपूर चे रशीद काकर, आसिफ काकर , उस्मान काकर, नजीर काकर, युसूफ काकर तथा राज्यभरातील काकर सौदागर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सौदागर एकता असोसिएशन ॲण्ड वेल्फेयर सोसायटी भोजडे (ता. कोपरगांव), सलीम बाबूलाल (भोजडे सौदागर काकर बिरादरी अध्यक्ष) बाबा कालू (उपाध्यक्ष), लब्बैक सोशल ग्रुप कय्यूम कालू (अध्यक्ष), शेरू दिलावर (उपाध्यक्ष), शमीम गफ्फार, अखलाक बदरू, समीर सांडू, अरबाज़ इब्राहिम,जमीर सांडू, अरबाज सलीम, न्याजुद्दीन शेखनूर, काजिम मुनीर, समीर मुनीर, अरबाज फकीर, अजरूद्दीन सदरुद्दिन, शमीम अय्यूब, आरिफ जब्बार, मुश्ताक जैनुद्दीन, बदर नूरा, बदर शहाबुद्दीन, सदरू बाबुलाल, जावेद सांडू, सांडू हुसेन, सिकंदर दादामिया , गुलाब नूर, मेहबूब जाफर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
वृत्त विशेष सहयोग
इक्बाल इस्माईल काकर (सर)
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -9561174111